संगमनेरमध्ये रोहोकले गटाला खिंडार

संचालक राहणे, अंजली मुळे, राहिंज तांबे गटात

अहमदनगर (प्रतिनिधी ): जिल्ह्यातील शिक्षकांच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या घडामोडींनी वेग घेतला असून आठ दिवसापूर्वी स्थापन झालेल्या शिक्षक परिषदेच्या महिला आघाडीच्या संगमनेर येथील कार्याध्यक्षा अंजली मुळे, शिक्षक बँकेचे संगमनेरचे विद्यमान संचालक राजू राहणे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भाऊराव राहींज, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अरुण आवारी, शिक्षक संघाचे तालुका कार्याध्यक्ष सुनील ढेरंगे, सरचिटणीस केशव घुगे, माजी विश्वस्त पी डी सोनवणे आदीसह संगमनेर तालुक्यातील दीडशे कार्यकर्त्यांनी गुरुमाऊली मंडळ तांबे गटात प्रवेश केला.

आठच दिवसांमध्ये रावसाहेब रोहोकले गटाला जिल्ह्यात खिंडार पडल्याने रोहोकले गटाला मोठा धक्का बसला आहे. संगमनेर येथील गायत्री मंदिर सभागृहांमध्ये गुरुमाऊली मंडळ व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे राज्य संघाचे उपाध्यक्ष कैलास चिंधे, शिक्षक बँकेचे चेअरमन साहेबराव अनाप, मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पिसे व बँकेचे संचालक किसनराव खेमनर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी रोहकले गटाची साथ सोडून तांबे गटासोबत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. आज तांबे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये सर्वश्री.

भाऊराव राहिंज, सुनील ढेरंगे, राजू राहणे, दिनकर सागर, अंजली मुळे, पी डी सोनवणे, अरुण आवारी, केशव घुगे, सयाजी राहणे, प्रदीप राहणे, सुभाष लहाने, दत्तात्रय सुपेकर, विलास दिघे, अरुण कासार, हेमंत लोहकरे, मच्छिंद्र पावसे, प्रकाश शिंदे, दत्तात्रय दिघे, रामनाथ कारले, संदीप पर्बत ,दीपक कानडे, भरत काळे, कैलास भागवत, एकनाथ लोंढे, भाऊसाहेब भागवत, जालिंदर बर्डे, भीमराज उगलमुगले, नारायण सुपेकर, जिजाभाऊ नेहे , गीताराम नवले, सुभाष औटी , भाऊसाहेब काकडे, योगेश नवले, लहानु सहाने, बाळू आहेर, आर जी पावसे, लक्ष्मण भारती, लक्ष्मण सूर्यवंशी आदींचा समावेश आहे.

तांबे गटाकडून दिशाभूल

संगमनेर तालुकयातील शिक्षक परिषदेची कार्यकारणी निवड झालेली नसतांना जिल्हयातील काही विघ्नसंतोषी मंडळी रावसाहेब रोहकले यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारच्या बदनामीच्या पोस्ट टाकून जिल्हयातील शिक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी अशा लोकांपासून सावध रहावे व जिल्हयातील शिक्षकांचे आदरस्थान शिक्षकांचे
नेते रावसाहेब रोहोकले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,असे आवाहन रोहोकले गटाचे मिलिंद तनपुरे,बाळासाहेब रोहोकले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)