सराईतांकडून दोन पिस्तूलांसह तीन काडतुसे हस्तगत

मरकळ येथे गुन्हे शाखेची कारवाई

महाळुंगे इंगळे-पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनकडून दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसांसह दोघांना खेड तालुक्‍यातील मरकळ भागातून जेरबंद करण्यात आले. त्यांनी ही अग्निशस्त्रे नेमकी कुणाला विक्रीसाठी या भागात आणली होती, याचा शोध महाळुंगे इंगळे पोलीस घेत आहेत.

सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय 24, रा. सोळू, ता. खेड) व सुरज अशोक शिवले (वय 19, रा. आपटी, ता. शिरूर) अशी दोघा सराईतांची नावे आहेत. गुरुवारी (दि. 19) रात्री गुन्हे शाखेचे पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकातील विठ्ठल सानप व गंगाधर चव्हाण यांना त्यांच्या गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली की, दोघेजण बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगून मरकळ येथे विक्रीसाठी येणार आहेत. यानंतर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी मरकळ भागात सापळा रचून वरील दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे अशी एक लाख, 11 हजार 500 रुपये किंमतीची अग्नीशस्त्रे मिळून आली. त्यांना अटक करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×