पुणे -पुणे जिल्ह्यात 12 हजार 255 जणांनाच लस देण्यात आली असून, त्यामध्ये 60 वर्षे वयापुढील आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे.
60 वर्षे वयापुढील 6 हजार 11 जणांना लस देण्यात आली. तर 45 ते 59 वर्षे वयापुढील 5 हजार 160 जणांना लस देण्यात आली.
अन्य लाभार्थी हे फ्रंटलाइन, हेल्थकेअर वर्कर्स आणि वरील वयोगटातील पहिला डोस घेणारे आहेत. पुणे ग्रामीणमध्ये 2 हजार 554, पुणे शहरात 7 हजार 816 आणि पिंपरी चिंचवड हद्दीत 1 हजार 885 जणांना लस देण्यात आली.