प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून हवेली उपविभागीय अधिकारी, हवेली तहसीलदार आणि पंचायत समिती यांच्या विद्यमाने शहरातील चार केंद्रांवर सर्व वयोगटांसाठी चित्रकला स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत
320 जणांनी भाग घेतला. ऍमेनोरा सिटी पवार पब्लिक स्कूल, भावे हायस्कूल सदाशिव पेठ, नांदेड सिटी पवार पब्लिक स्कूल आणि बीजेएस कॅम्पस वाघोली या चार ठिकाणी सकाळी सकाळी 10 ते 12 या वेळेत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “भारतीय स्वातंत्र्य संग्राम’ आणि “गौरवशाली भारत : 1947 ते 2022′ हे विषय चित्रकला स्पर्धेसाठी देण्यात आले होते. प्रांताधिकारी संजय आसवले, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.