पुणे – पुण्यात बुधवारी 86 करोना बाधित सापडले तर सात जण या साथीत मरण पावले. त्यामध्ये मंगळवारी रात्रीपर्यंत 4 तर बुधवारी दिवसभरात 3 असे एकूण 7 जणांचा समावेश आहे. ससून रुग्णालयात 2, भारती विद्यापीठ, कोथरूड येथील सह्याद्री, वायसीएम आणि रुबी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि. 5) दुपारी 68 वर्षीय व्यक्तीला अत्यवस्थ अवस्थेत ससून रुग्णालयात आणण्यात आलेल्या रुग्णाचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्याच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. तसेच चार तारखेला दाखल 75 वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी ससूनमध्ये मृत्यू झाला. हे दोघे ताडीवाला परिसरातील होते. सह्याद्री रुग्णालयात 69 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या येरवडा परिसरातील होत्या. भारती हॉस्पिटल आणि वायसीएम रुग्णालयात प्रत्येक एक मरण पावला.