“सार्वजनिक बांधकाम’मध्ये कामबंद 

अभियंत्यावर चिखल फेक प्रकरण : सोमवार, मंगळवार सामूहिक रजा आंदोलन

असंविधानिक काम करणाऱ्यांवर निवडणूक बंदी घाला

जिल्ह्यात अनेक लोकप्रतिनिधी हे असंविधानिक काम अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करून घेतात. या कामास विरोध केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जाणूनबुजून लक्ष केले जाते. त्यामुळे नाइलाजास्तव कर्मचारी यांना काम करावे लागते. अशा लोकप्रतिनिधींना निवडणूक बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनकर्त्यांकडून होत आहे.

नगर – मुंबई-गोवा महामार्गावर साचलेला चिखल आणि पडलेल्या खड्ड्याना जबाबदार धरत गुरुवारी (दि.4) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतला व तसेच धक्काबुक्की करून पुलाला बांधल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करत कामकाज बंद केले. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांना निवेदन देवून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जगबुडी नदीवरील पुलावर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता बामणे व उपअभियंता गायकवाड यांना पुलाच्या रेलिंगला बांधून मारहाण करण्यात आली होती.

तसेच गुरुवारी (दि.5) रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली जवळ उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल टाकून त्यांचा अवमान करून पुलाला बांधून लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रकार हा अपमानास्पद आहे. याघटनेच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तिव्र निषेध करण्यात येत आहे. मागील आठवड्यात शासकिय कर्तव्ये बजावत असलेल्या अभियंत्यांना काही लोकप्रतिनिधीद्वारे कायदा हातात घेऊन अपमानास्पद वर्तवणूक देवून शारीरिक इजा पोहचवण्याचे प्रकार घडलेले आहेत.

तसेच अशा प्रकारच्या काही घटना आपल्याही जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ, व अंतर्गत सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी शुक्रवार (दि. 5 व 6) जुलै रोजी कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन सुरु केले आहे. तर सोमवार व मंगळवार (दि.8 व 9 जुलै) रोजी सामुहिक रजेवर गेले असून, संबंधीत आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

शासकीय बैठकीवर बहिष्कार
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येत्या पाच दिवस कामबंद आंदोलन छेडले असल्याने शासकीय, तसेच लोकप्रतिनिधी, नवीन कामांच्या शुभारंभावेळी जिल्ह्यातील एकही अधिकारी, कर्मचारी हजर राहणार नाही असा पवित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला असून, बैठकीवर बहिष्कारही टाकणार असल्याचे सांगितले.

असंविधानिक काम करणाऱ्यांवर निवडणूक बंदी घाला
जिल्ह्यात अनेक लोकप्रतिनिधी हे असंविधानिक काम अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करून घेतात. या कामास विरोध केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जाणूनबुजून लक्ष केले जाते. त्यामुळे नाइलाजास्तव कर्मचारी यांना काम करावे लागते. अशा लोकप्रतिनिधींना निवडणूक बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनकर्त्यांकडून होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.