मुंबई – आज महाराष्ट्रात 10,552 नव्या कोरोना संक्रमित रूग्णांची भर पडली असून 158 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19,517 जण उपचारानंतर बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
महराष्ट्रात आता कोरोना संक्रमित होणाऱ्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल 19,517 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत एकूण 15,54,389 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 13,16,769 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1,96,288 सक्रिय बाधित आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.