राजगुरूनगर (प्रतिनिधी ) : करोनाचे संकटामुळे खेड तालुक्यात आज 74 वा स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. करोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या समुपदेशक अपेक्षा बोरकर यांच्या शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
राजगुरूनगर येथे खेड तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. खेड तालुक्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात प्रमुखासह निवडक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, नायब तहसीलदार राजेश काणसकर, मालती धोत्रे, वनाधिकारी आशितोष शेंडगे, बांधकाम विभागाचे मधुकर भिंगारदिवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, राजगुरूनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, सर्कल सविता घुमटकर, यांच्यासह शासकीय अधिकारी, शहरातील मान्यवर उपस्थित होते.