Baramati Lok Sabha Election 2024| राज्यात चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघात आज मतदान पार पडत आहे. यादरम्यान बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं समोर आलं आहे. गेल्या ४५ मिनिटांपासून हे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती आहे. याबाबत शरद पवार गटाकडून संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी यात काही काळंबेरं तर नाही ना अशी शंका उपस्थित होत असल्याचे म्हंटले आहे. “बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. त्या गोदमाचे सीसीटिव्ही सकाळी 10.50 पासून बंद पडलेले आहे. त्यामुळं यात काही काळंबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही,” असे खाबिया यांनी म्हंटले आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, “मी त्या विभागातील जे अधिकारी आहेत त्यांनाही फोन केला. पण त्यांचा काहीच रिप्लाय आला नाही. संबंधितांशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे कोणीही टेक्निशियन नाही. आमचे कार्यकर्ते तेथे उपस्थित आहेत पण त्यांना गोदाम दाखवत नाहीत. पोलिस म्हणतात आम्हाला काही सूचना मिळालेल्या नाहीत. हे चालले तरी काय?”, असा सवालही शरद पवार गटाचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे. Baramati Lok Sabha Election 2024|
बारामती लोकसभा मतदारसंघातील #EVM ठेवलेल्या गोडवूनमधील #CCTV ४३ मिनिटं बंद असल्याची माहिती ही धक्कादायक आहेच पण काही गैरप्रकार करण्यासाठी तर जाणीवपूर्वक हा प्रकार केला नाही ना, अशी दाट शंका येते. ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आवश्यक असतं त्याप्रमाणे EVM च्या गोडावूनमध्येही… pic.twitter.com/rylgLJjur3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 13, 2024
….तर जाणीवपूर्वक हा प्रकार केला नाही ना
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. “बारामती लोकसभा मतदारसंघातील EVM ठेवलेल्या गोडवूनमधील CCTV ४३ मिनिटं बंद असल्याची माहिती ही धक्कादायक आहेच पण काही गैरप्रकार करण्यासाठी तर जाणीवपूर्वक हा प्रकार केला नाही ना, अशी दाट शंका येते.” Baramati Lok Sabha Election 2024|
“ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आवश्यक असतं त्याप्रमाणे EVM च्या गोडावूनमध्येही CCTV यंत्रणा सुरू असणं आवश्यक आहे. निवडणूक आयोग कमी पडत असेल तर ही निवडणूक निष्पक्षपणे कशी म्हणता येईल? या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी रोहित पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केली आहे.