बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दररोज तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फॅन्स सुद्धा तिच्या बोल्ड लूकवर कमेंटचा वर्षाव करत असतात.
View this post on Instagram
बिग बॉस मध्ये उर्फी जावेदचा प्रवास खूपच लवकर समाप्त झाला. मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ती सोशल मीडियावरून खूपच ऍक्टिव्ह राहिली होती.
नुकतंच उर्फीने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोट शेअर केले असून, पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये निळ्या रंगाची बिकनी परिधान केली
View this post on Instagram
सध्याच्या घडीला उर्फी पापाराझींची सर्वात जास्त आवडती अभिनेत्री आहे. ती ज्याठिकाणी जाते त्याठिकाणाहून तिला कैद करण्यासाठी पापाराझी तिच्या मागे असतात. उर्फी सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
View this post on Instagram
उर्फी ‘सात फेरी की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. ती टीव्हीवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली आहे. उर्फीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले, तरी बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर उर्फी अधिक लोकप्रिय झाली आहे. या शोमधला तिचा प्रवास खूपच छोटा होता, पण शोमुळे तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत गेली आहे.