मुंबई – वरळी गॅस स्फोट प्रकरणातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मुंबईच्या महापौरांना 72 तासांनंतर वेळ मिळाला होता, एवढा काळ त्या कोठे झोपल्या होत्या असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान,वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आले आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे. याबाबत अद्या माहिती समोर आलेली नाही आहे.
या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे. महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअर द्वारे आलेलं आहे. पत्राच्या पाकिटावर वेगळं नाव आहे. पत्रात वेगळं नाव आहे. खारगर, पनवेल आणि उरण अशी तीन ठिकाणं त्याचा उल्लेख आहे. हे निनावी पत्र आहे.
महापौर झाल्यापासून दुसऱ्यांदा धमकी
गेल्यावर्षीही महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे.