नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना देखील आगामी काळामध्ये भ्र÷टाचाराच्या आरोपाखाली अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्धी माध्यमांनी ही शक्यता वर्तवली आहे. (Pak news)
बुशरा बिबी (bushara beebi) यांच्या काही आर्थिक व्यवहारांची तपासणी सध्या उत्तरदायित्व विभागाकडून केली जाते आहे. त्यातून काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. बुशरा बिबी यांच्या भ्र÷टाचाराशी संबंधित हा एक महत्वाचा पुरावा होऊ शकतो. जर हे पुरावे खरे असतील, तर बुशरा बिबी या “साक्षीदार’ न ठरता “आरोपी’ ठरू शकतात. त्यामुळे त्यांना देखील इम्रान खान यांच्या प्रमाणे अटक केली जाऊ शकते, असे पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.
गोपनीयतेच्या कायद्याचा बंग केल्याच्या आरोपावरून इम्रान खान यांना ऑगस्ट महिन्यात अटक केली गेली आहे. आता इम्रान खान यांच्याशी संबंधित तोशखाना आणि 190 दशलक्ष पौंडांच्या अल-कादिर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणाचा तपास देखील “एनएबी’ने हाती घेतला आहे.
अल-कादिर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी “एनएबी’ने बुशरा बिबी आणि त्यांच्या निकटच्या सहकारी फराह शहजादी यांना 13 नोव्हंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स पाठवले आहे. शहजादी यांची मालमत्ता 2017 पासून 2020 दरम्यान 4,550 दशलक्ष रुपयांनी वाढली आहे.