लाहोर – पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू रमीज राजा आपल्या पदाच्या राजीनामा देणार असल्याचे वर्तवले जात आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान निवडून आल्यावर त्यांनी केलेल्या विनंतीवरून राजा यांनी समालोचनाचा करार सोडून पाक मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले होते.
मात्र, इम्रान त्यांच्या पदावर जोपर्यंत राहतील तोपर्यंतच मंडळाच्या अध्यक्षपदावर राहीन, असे राजा यांनी सांगितले होते. आता पाकिस्तानातील राजकीय उलथापालथ झाल्यावर इम्रान यांचे पंतप्रधानपदही गेल्यामुळे राजा देखील मंडळाचे अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.