पुणे – महापालिकेकडून येत्या गुरूवारी (दि. 13) रोजी लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर व राजीवगांधी पंपिंग येथील विद्युत,पंपींग विषयक व वितरण विभागाकडील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, या जलकेंद्राच्या अखत्यारीतील येणाऱ्या भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ( शुक्रवारी) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
या भागात राहणार पाणी बंद-
लष्कर जलकेंद्र भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु. शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.