नवी दिल्ली – एक फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांशी निगडीत असणारे चार मोठ बदल होणार आहेत. याचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. या नवीन नियमांनुसार तुम्हाला काहीअंशी दिलासा मिळणार आहे. तसेच काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पीएनबी एटीएममधून पैसे काढण्याचा नियम, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत, अर्थ मंत्र्यांकडून सादर केला जाणारा अर्थसंकल्प, हवाई वाहतूक यांचा समावेश आहे.
हेही वाचा – IMP NEWS Budget 2021 : कोणत्या वस्तू होणार ‘महाग’, कोणत्या ‘स्वस्त’ ? पाहा संपूर्ण यादी
अर्थमंत्री बजट सादर करणार –
एक फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2021-2022 चे बजट सादर करतील. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच पेपरलेस बजट सादर करण्यात येणार आहे. करोनामुळे नुकसान झालेल्या लोकांना या बजटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. नोकदारांच्या करात कपात केली जाऊ शकते.
इतर व्यवहारांना देखील दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही गोष्टी महाग होऊ शकतात तर काहींच्या किंमती कमी होतील. सरकारकडून अनेक वस्तुंच्या सीमा शुल्कांवर कपात केली जाऊ शकते. करोनासाथीच्या काळात या बजटचे महत्व अनन्यासाधारण असल्याचे सांगितले जात आहे. ‘यूनियन बजट मोबाइल अॅप’ च्या माध्यमातून खासदार आणि सामान्य नागरिक बजटशी संबंधीत डाॅक्युमेंट मिळवू शकतात.
Budget_2021 | अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर सोन्याच्या दरात ‘मोठी’ घट; वाचा आजचे दर…
PNB खातेदार या ATM मधून पैसे काढू शकणार नाही –
देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बॅंक पंजाब नॅशनल बॅकने (PNB) खातेदारांना फसवणुकींपासून वाचवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. एक फ्रेब्रुवारी 2021 पासून पीएनबी ग्राहक नाॅन-ईएमवी एटीएम मशीनद्वारे देणे-घेण्याचे व्यवहार करू शकणार नाहीत. म्हणजेच नाॅन-ईएमवी मशीनमधून पैसे काढता येणार नाहीत. दरम्यान, या संदर्भात पीएनबी बॅंकेने आपल्या अधिकृत ट्विटरून माहिती दिलेली आहे. ‘ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी पीएनबी नाॅन-ईएमवी एटीएम मशीनमधून एक फेब्रुवारीपासून देणे-घेण्याचे व्यवहार करू शकणार नाही. गो-डिजिटल, गो-सेफ’, असे बॅंकेने ट्वीट करून सांगितले आहे.
LPG च्या किंमती –
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींमध्ये चढ-उतार करत असतात. प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर असतात आणि त्यानुसार एलपीजी च्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असतात. सध्या सरकारकडून एक वर्षात प्रत्येक घरासाठी 14.2 किलो चे 12 सिलिंडरवर सब्सिडी दिली जाते. त्यानंतर जर ग्राहकांना सिलिंडर घ्यायचा असेल तर तो बाजार मूल्यानुसार घ्यावा लागतो. गॅस सिलिंडरच्या किंमती दर महिन्याला बदलत असतात. यांची किंमत आंतराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय विनिमय दरात बदल झाल्यास किंमतीत चढ-उतार होत असतात.
https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करून तुम्ही गॅसच्या किंमती पाहू शकता.
नवीन उड्डाणं सुरू करणार एअर इंडिया –
एअर इंडियाकडून नवीन उड्डाणांची घोषणा करण्यात आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून फेब्रुवारी पासून 27 मार्चदरम्यान त्रिची आणि सिंगापुर साठी दररोज उड्डाण सुरू करण्यात येणार आहे.