प्रशांत किशोर यांचे अमित शहा यांना खुले आव्हान
नवी दिल्ली : ज्या तारस्वरात आपण सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरीकत्व सुचीला (एनआरसी) च्या अनक्रमे लागू करणार असल्याचे सांगत आहात, ते करून दाखवाच,असे खुले आव्हान जनता दल संयुक्तचे नेते आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले. नव्या कायद्याचा फेरविचार करणार नसल्याच्या शहा यांच्या वक्तव्याचाही तयांनी ट्विटरवरून समाचार घेतला.
लखनऊ येथील सभेत अमित शहा म्हणाले होते, कितीही विरोध झाला तरी नव्या कायद्याची अंमलबजावणी केली जाइरल. निदर्शकांनी त्यांची निदर्शने सुरू ठेवावीत. कितीही निदर्शने झाली कितीही विरोध झाला तरी नवा कायदा मागे घेतला जाणार नाही.
ट्विटरवर प्रशांत किशोर यांनी शहा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, अमित शहाजी, नागरिकांचुया मतभेदाकडे दूर्लक्ष करणे म्हणजे सरकारच्या ताकदीचे लक्षण नव्हे. जर का आणि एनआरसीला होणाऱ्या विरोधाची तुम्ही पर्वा करत नसाल तर तुम्ही ज्या तारस्वरात याची घोषणा करता त्याच क्रमाने का आणि एनआरसी लागू करून दाखवाच.
दरम्यान सुधारीत नागरीकत्व कायद्याला (का) स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, वादग्रस्त नागरीकत्व कायद्याबाबात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधिशांचे घटनापीठ नेमण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याबाबत केंद्र सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली असून त्याबाबत सुनावणी होईपर्यंत स्थगिती देण्यास सरन्यायाधिस एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नकार दिला.