मुंबई- विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सभागृहातील सर्व नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, अभिनंदन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी फडणवीस म्हणले, “मी पुन्हा येईन पण मी त्यावेळी टाईमटेबल सांगितलं नव्हतं…. पण काळजी करू नका… ‘मेरा पाणी उतरता देख… मेरे किनारें पें घर मत बसा देना… मैं समंदर हूँ, लोटकर वापस आऊंगा” अशा शब्दांत फणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे.
BJP leader Devendra Fadnavis has been elected as Leader of Opposition of Maharashtra Assembly. https://t.co/PVUml7fPd2 pic.twitter.com/6F34Il388O
— ANI (@ANI) December 1, 2019