#TwitterAlert : तर होऊ शकत ट्विटर अकाऊंट कायमच बंद

मुंबई – आजच्या डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक घडामोडीबद्दल प्रत्येकाला फेसबुक,  ट्विटरच्या माध्यमातून माहिती मिळत असते. मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ न वापरलेले ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याचा इशारा ‘ट्विटर’कडून देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटर अकाऊंट्स बंद ही कारवाई सहा महिन्यांपासून साइन इन न केलेल्या अकाऊंट्सवरही होणार आहे. ट्विटर युजर्सनी आपले ट्विटर अकाऊंट्स ११ डिसेंबरपर्यंत अकाऊंट साइन इन न केल्यास ते कायमचे बंद केले जाईल. ट्विटर अकाऊंट्स बंद होण्याआधी युजरला ‘ट्विटर अलर्ट’ पाठवला जाईल. त्यानंतरही साइन इन न केल्यास किंवा अकाऊंट न वापरल्यास युजरचा ट्विटर अकाऊंट कायमचा बंद करण्यात येईल.

दरम्यान, ट्विटरवर अॅक्टिव्ह नसलेल्या युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचे काम सुरू आहे. यामुळे इतर युजर्सना चांगली सेवा मिळू शकेल आणि त्यांचा ट्विटरवरील विश्वास वाढेल, असं ट्विटरच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे अकाऊंट्स बंद करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात नाही, तर काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असंदेखील त्यांनी म्हटलंय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)