… मी शांत होतो … पण घबराट नव्हतो ! मनमोहनसिंग

नवी दिल्ली – लोक जरी मला सायलेंट पीएम असे म्हणत असले तरी मी त्यांच्यासारखा घाबरट नव्हतो. मी कधीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळून जात नव्हतो, अशी खोचक टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. चेंजिंग इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

पाच वर्षात पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. याच पार्श्‍वभूमीवर मनमोहन सिंह यांनी मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे की, ‘नागरिक म्हणतात, मी सायलेंट पीएम आहे. या पुस्तकातून माझे व्यक्तिमत्व तुम्हाला कळेल. पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळून जाणारा मी पंतप्रधान नव्हे. पत्रकारांशी मी सतत संवाद साधत होतो. प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर मी दौऱ्याविषयी माहिती देत होतो, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.