सासवड (प्रतिनिधी)- पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणी सीएससी सेंटरला मंजुरी मिळालेल्या आहेत. या सीएससी सेंटरमधून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनासाठी के. वाय. सी त्याच बरोबर ऑनलाइन दाखले याच्यासह अनेक कायदेशीर दस्तावेज मिळतात. या दस्ताऐवजांसाठी सीएसटी सेंटर शेतकऱ्यांचे लूट करीत असून एका केवायसीसाठी शंभर रुपये चार्ज आकारला जात आहे. बेकायदेशीर वसुली थांबवण्याची चर्चा सध्या तालुक्यामध्ये आहे.
शासकीय योजनांसाठी अर्ज करणाऱ्यांचे हाल होत असून, प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिक करीत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजना त्याचबरोबर दुष्काळी अनुदान योजनेसाठी केवायसी करण्याच्या सूचना सातत्याने येत आहे. प्रत्येकवेळी सीएससी सेंटर चालकांकडून शंभर रुपयांच्या करणे केली जात आहे.
सामान्य लोकांच्या सोयीसाठी उघडलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर/अटल सेवा केंद्र CSC मध्ये लोकांकडून बेकायदेशीर वसुली केली जात आहे. अनेक केंद्रांवर 10 ते 20 रुपयांमध्ये होणारी कामे होत नाही, उलट थेट 100 ते 250 रुपयांची फसवणूक केली जात आहे. मात्र सीएससी ऑपरेटर्सवर दर निश्चित करण्याबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
अशा स्थितीत सीएससी ऑपरेटर नागरिकांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करीत आहेत.
दर यादीअभावी लोकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. सीएससीच्या आत आणि बाहेर कोणत्या सुविधांसाठी अर्ज करता येईल हे लिहिलेले आहे, परंतु दर यादी पोस्ट केलेली नाही. दर माहीत नसल्याने लोकांना जास्त पैसेही मोजावे लागत आहेत.
जर कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर, अटल सेवा केंद्रात सरकारने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील. तक्रार आल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल. के. वाय. सी साठी एकही रुपया शेतकऱ्यांनी देऊ नये. सर्व सेंटर चालकाना सूचना दिल्या आहे. लोकांना माहिती मिळावी यासाठी दर यादीही लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
सीएससी सेंटर चालकांकडून शेतकऱ्यांची लुट सुरु आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडे डेटा ऑपरेटर उपलब्ध असताना देखील डेटा ऑपरेटर शेतकऱ्यांचे कोणतीही कामे करीत नाहीत. डेटा ऑपरेटरने ग्रामपंचायतीच्या बाहेर जाऊन खासगी कामे करून पैसे कमवत आहेत. – सोमनाथ कणसे, सरपंच, जवळार्जुन.