मुंगर (बिहार) – बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात पोलिसांनी एक बेकायदेशीर शस्त्रांचा कारखाना उद्ध्वस्त केला आणि छाप्यादरम्यान एकाच कुटुंबातील तिघाजणांना अटक केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मुंगेर जिल्ह्यातील हवेली खरगपूर पोलीस ठण्याच्य हद्दीतील मुधेरी गावात छापा घातला. यावेळी बेकायदेशीर शस्त्रे, दारुगोळा अणि बंदुका बनवण्याची यंत्रसामुग्रीही जप्त करण्यात आली, असे पोलीस अधिक्षक लिपी सिंह यांनी सांगितले.
पोलिसांनी या ठिकाणवरून 10 देशी बनवटीची पिस्तूल, 3 रायफली, 12 मॅगझीन जप्त केली अहेत, असेही सिंह यांनी सांगितले. या प्रकरणी खरगपूर पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात एकाच कुटुंबातील तिघाजणांना अटक करण्यात आली असून हे कुटुंब बेकायदेशीर शस्त्रे तयार करण्याच्या उद्योगामध्ये गुंतलेले होते आणि ते बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसह बिहारच्या अन्य जिल्ह्यांमध्ये या शस्त्रांची विक्री करत असत, असे पोलिसांनी सांगितले.