नवी दिल्ली : आयजोल एफसी संघाने शुक्रवारी आय लीग फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात ईस्ट बंगालचा १-० असा पराभव केला. या पराभवामुळे ईस्ट बंगालच्या स्पर्धेत विजेतेपद पटकवण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
FT: BIG BIG result 🤩 for @AizawlFC as they down @eastbengalfc in Kalyani 👏🏻
QEB 0⃣-1⃣ AFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #QEBAFC ⚔ pic.twitter.com/v3fc9CZvpT
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 7, 2020
अर्जेंटीनाच्या माटियास वेरोनने ७६ व्या मिनिटाला गोल करत आयजोल एफसी संघाला विजय मिळवून दिला. ईस्ट बंगालचा मागील सहा सामन्यातील हा पाचवा पराभव आहे तर नवीन प्रशिक्षक आल्यापासून ईस्ट बंगालचा सलग दुसरा पराभव ठरला.
76' MATIAS VERON 🤩 opens the scoreline for @AizawlFC 🔴
Will @eastbengalfc suffer another defeat at home tonight ❓
QEB 0⃣-1⃣ AFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #QEBAFC ⚔ pic.twitter.com/wmtJCU5Ymp
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 7, 2020
या पराभवासह ईस्ट बंगालचा संघाची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. दुसरीकडे आयजोल एफसी संघाचे १० सामन्यात ११ गुण झाले असून गुणतालिकेत ते सातव्या स्थानी आहेत.