बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने “केदारनाथ’ चित्रपटातून आपल्या कारर्किदीला सुरुवात केली. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झाले. त्यानंतर तिने सिंबामध्ये काम केले. दरम्यान, साराने वडील सैफ अली खानसोबत बहुचर्चित “कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता कार्तिक आर्यनवर क्रश असल्याची कबुली तिने दिली होती.
View this post on Instagram
#HaanMainGalat but song #BahutSahi ?? Watch us #DoItWithATwist????? #LoveAajKal ❤️???♀️
“कॉफी विथ करण’मध्ये साराने संधी मिळाली तर मला कार्तिकला डेट करायला आवडेल, असेही यावेळी म्हटले होते. या शोनंतर काही दिवसांतच रणवीरने एका पार्टीमध्ये सारा-कार्तिकची भेट घडवून आणली होती. त्यांच्या या भेटीचे व्हिडीओ सुद्धा त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र यामध्ये असे काही सत्य होते जे सारा आणि कार्तिकने रणवीरपासून लपवून ठेवले होते. पण आता याचा खुलासा झाला आहे.
सारा आणि कार्तिकचा आगामी “लव्ह आजकल’चे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सारा म्हणाली, रणवीरने कार्तिकसोबत तिची भेट घडवून आणण्याआधीच हे दोघेही एकमेकांना भेटले होते. पण जेव्हा रणवीरने त्यांची भेट घडवून आणली. त्यावेळी त्यांनी रणवीरला वाईट वाटू नये यासाठी हे सत्य त्याच्यापासून लपवले.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती कार्तिक आर्यनसोबत “लव्ह आज कल’मध्ये झळकणार आहे.हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत “कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये सुद्धा दिसणार आहे.