India vs South Africa 3rd T20 Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (गुरुवारी,14 डिसेंबर) होत आहे. दोन्ही संघ जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळत आहेत.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करणार आहे. शेवटच्या सामन्यात आफ्रिकन संघाने धावांचा पाठलाग करून सामना जिंकला होता.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने तीन बदल केले आहेत. केशव महाराज, नांद्रे बर्जर आणि डोनोवन फरेरा यांना स्थान मिळाले आहे.
IND vs SA Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
दक्षिण आफ्रिका : रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्जर.
🪙TOSS
🇿🇦 Proteas have won the toss and will bowl first 🏏
🧢 Nandre Burger earns his 1️⃣st cap for SA
✅ Maharaj comes in for Jansen
✅Ferreira replaces Stubbs #WozaNawe #BePartOfIt #SAvIND pic.twitter.com/lGOCXwTznR— Proteas Men (@ProteasMenCSA) December 14, 2023
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
दरम्यान, दुसरा सामना जिंकून आफ्रिकन संघाने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर आफ्रिका मालिका जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.