India vs South Africa 3rd T20 Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (14 डिसेंबर) होणार आहे. दोन्ही संघ जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळत आहेत.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करणार आहे. शेवटच्या सामन्यात आफ्रिकन संघाने धावांचा पाठलाग करून सामना जिंकला होता.
South Africa Won the Toss & elected to Field https://t.co/NYt49KwF6j #SAvIND
— BCCI (@BCCI) December 14, 2023
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने तीन बदल केले आहेत. केशव महाराज, नांद्रे बर्जर आणि डोनोवन फरेरा यांना स्थान मिळाले आहे.
दरम्यान, दुसरा सामना जिंकून आफ्रिकन संघाने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर आफ्रिका मालिका जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.