गैरव्यवहार केला असेल तर अटक करा

मनीष सिसोदिया यांचे मनोज तिवारी यांना आव्हान

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी दोन हजार कोटी रुपयांचा शिक्षण घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यावर मनीष सिसोदिया यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मनोज तिवारींना खुले आव्हान दिले आहे. एक तर आमच्यावरील आरोप सिद्ध करा अन्यथा सर्वांची माफी मागा, असे त्यांनी म्हटले आहे.

सिसोदिया यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचार करणारा आरोपी मोकाट फिरत आहे, तर मग तुमच्यात हिम्मत असेल तर अटक करा. अन्यथा दिल्लीच्या गरिबांची पालक व शिक्षकांची माफी मागा.

दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जुन्याच शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बनवल्या आहेत व यामध्ये तब्बल दोन हजार कोटींचा गैरव्यवहार केला आहे. त्यांनी सांगितले की 300 स्क्वेअर फूटच्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत, ज्यावर आमच्या मते प्रति वर्गखोलीस तीन ते पाच लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. मात्र दिल्ली सरकारने एका वर्ग खोलीसाठी 25 लाख रुपये घेतले आहेत.

तिवारी म्हणाले की, आरटीआयद्वारे माहिती मिळाली आहे, 12 हजार 784 वर्गखोल्या तयार होत आहेत. एकूण खर्च 2 हजार 892 कोटी रुपये येत आहे. मात्र आमच्या मते 892 कोटी रुपयांमध्येच हे तयार
व्हायला हवे. त्यामुळे यात पाणी मुरले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.