सुलतानपूर (उत्तर प्रदेश) – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रचारा दरम्यान मला मतदान करा, अन्यथा नंतर नोकरीकरिता माझ्याकडे येताल, तेंव्हा मला देखील मग विचार करावा लागेल, असे वक्तव्य करत मुस्लिम समाजाला सुनावले आहे.
उत्तरप्रदेश मधील सुलतानपूर येथील प्रचार सभेमध्ये बोलताना मनेका गांधी यांनी मुस्लिम समाजाला थेट इशारा देतानाच, तुम्ही मला मत द्या अगर देऊ नका, मी जिंकणार हे नक्की आहे, मात्र त्यानंतर माझा विजय तुमच्या शिवाय झाला तर मला वाईट वाटेल आणि पुढे मुस्लिम बांधव जेंव्हा माझ्याकडे मदत मागायला येतील तेंव्हा मला देखील विचार करायला लागेल असे त्यांनी म्हंटले आहे.
मी जर मैत्रीसाठी तुमच्यापुढे हात करत असेल तर, तुम्हीही ती स्वीकारायला हवी असे म्हणत मनेका गांधी यांनी तुम्ही मला मत दिले नाही तर मलाही तुमचा विचार करता येणार नाही असा धमकीवजा इशाराच दिला आहे.