चौकीदाराची झालीय झोपमोड म्हणून काढत आहेत पवारांची खोड – धनंजय मुंडे

पुणे – शरद पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी आहे. हे नावही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे का. तुमचे सहकारी जाहीरपणे भारतात दोन पंतप्रधान करण्याच्या बाता करत आहेत. तरीही शरद पवारांना झोप कशी येते?, अशा शब्दांत मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नगर येथील सभेत टीका केली होती. या टीकेचा समाचार घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोशल माध्यवाद्वारे मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश विटकर यांच्या प्रचारार्थ जिंतूर व मंठा याठिकाणी धनंजय मुंडे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी मोदींवर पलटवार केला आहे. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्टिटदेखील केले आहे.

ट्वीट करताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, “चौकीदाराची झालीय झोपमोड म्हणून प्रत्येक सभेत काढत आहेत पवार साहेबांची खोड. मोदीजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या नसानसात ‘राष्ट्रवाद’ आहे. तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्हाला नावं ठेवण्याआधी भाजपाची तुम्ही भारतीय मोदी पार्टी केली त्याचं काय ते बघा.”

यासोबतच पुढे त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, “मोदींना शहीद जवानांच्या नावे मतं मागताना लाज वाटत नाही का? जवानांच्या कर्तृत्वाचे, धैर्याचे, बलिदानाचे असे राजकीय भांडवल करणारा पंतप्रधान मी याआधी कधीच पाहिला नाही. तुमच्या ५६ इंची छातीत दम असेल तर तुम्ही केलेल्या कामावर मतं मागा, शहीद जवानांच्या आणि टीकेच्या कुबड्या घेऊन नाही.”

दरम्यान, अहमदनगर महायुतीचे उमेदवार सुजय विखें आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अहमदनदर येथे आज पार पडली .यावेळी सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेससह राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

….तरीही पवार गप्प का..? नगरमधील सभेत मोदींचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.