Nitesh Rane – मनोज जरांगे पाटलांना ( Manoj Jarange ) पहिल्या दिवशीच स्पष्ट केले होते. देवेंद्र फडणवीस ( devendra Fadnavis ) यांच्यावर जर तुम्ही टीका कराल, तर आम्ही कधीही हे सहन करणार नाही. त्यामुळे आम्हाला देखील तुमच्या डोक्यात विष कोण टाकतोय, तुमची भाषणे कोण लिहून देत आहे.
तुमच्या तोंडातून मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण बोलायला लावतोय याची आम्हाला पुराव्यासहित यादी काढावी लागेल, अशा शब्दांत आमदार नीतेश राणे ( Nitesh Rane ) यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला.
राणे म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल बोलत रहाल तर आम्ही तुमचे स्वागतच करू. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारा आरक्षण दिले.
असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल, तर गाठ या माझ्याशी आहे हे लक्षात राहू द्या, असा इशारा राणे यांनी दिला आहे.