मुंबई – झी मराठीवर सुरु असणारा नवीन कुकरी शो म्हणजेच, ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजत आहे. अतिशय कमी कालावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतंच ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील काही तरुण-तडफदार नेतेमंडळी दिसून येत आहेत.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी, आमदार प्रणिती शिंदे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी हे तिघेही कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संकर्षणसोबत मजामस्ती करताना दिसून आले.
‘किचन कल्लाकार’ कार्यक्रमात रोहित पवार यांच्या एन्ट्री पूर्वी संकर्षण त्यांच्या विषय बोलताना दिसतो. “खानदानाचा राजकीय वारसा पुढे नेणारे, विविध उद्योगांमध्ये रुची असणारे, २०१९चे त्यांच्या पक्षाचे स्टार कॅम्पेनर, ममाज बॉय, चला हवा येऊ द्याचे भावी कॅन्डिडेट रोहित पवार..’ असे संकर्षण बोलताना दिसतो. तेवढ्यात रोहित यांची स्टेजवर एण्ट्री होती.
आणि रोहित सुद्धा संकर्षणच्या या प्रश्नांनावर गमतीशीर उत्तर देतेतात.. ‘मी आधी (चला हवा येऊ द्यामध्ये) येऊन गेलो आहे. तुम्ही मला परत एकदा बोलवायचं आहे. असं तुम्ही म्हणालात.’ त्यावर संकर्षण उत्तर देत, ‘लेखकाला असे वाटते की तुम्ही तिथे वारंवार यावं…. त्यावर रोहित पवार म्हणतात.. आमचं पहिलं सेशन खूप चांगलं झालं होतं. त्यामुळे मला आता दुसरं सेशल करायचं आहे. असं ते बोलतात.
पुढे संकर्षण म्हणतो, तुम्ही तिथे जे पंचेस फोडले ते तिथल्या कलाकारांपेक्षाही जोरदार फोडले. म्हणून तुम्ही परत यावं असं त्यांना वाटतं. आणि संकर्षणाच्या या वाक्यावर रोहित सुद्धा भन्नाट असं उत्तर देऊन जातात.. ‘राजकारण नाही जमलं तर नक्कीच चला हवा येऊ द्यामध्ये येईन.’ असं ते म्हणतात.
सध्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, यापूर्वी डिसेंबर २०२०मध्ये रोहित पवार यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अतिशय मनमोकळे पणानं उत्तरं दिली होती.