नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडल आहे. ऐन दिवाळीच्या काळात सर्वच महाग असल्याने दिवाळी साजरी करणं कठिण झालं आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने देशवासियांना दिलासा दिला असून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली आहे.
मोदी सरकारने अनुक्रमे पेट्रोलवरील कर पाच रुपयांनी तर डिझेलवरील कर १० रुपयांनी घटवला आहे. त्यामुळे पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. ऐन दिवाळीच्या काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे. आजपासून नवीन दर लागू होणार आहेत.
दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयांचे भाजप नेत्यानं कडून कौतुक केले जात आहे तर विरोधी पक्षांकडून या निर्णयाचे स्वागत करत सरकारवर टीका केली आहे. अशातच कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनीही फेसबूकवर पोस्ट शेअर मोदी सरकारचे आभार मानले असून गॅस सबसिडी बाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
काय आहे रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट