मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’नं प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. 23 नोव्हेंबर 1984 साली अमृताचा जन्म झाला.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या अमृताचा लूकआणि फॅशन सगळ्यांन पेक्षा अतिशय हटके असते. अमृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर फॅन्ससह शेअर करते.
दिवाळी निमित्त मराठमोळ्या अमृताने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. निळ्या रंगाच्या हॅन्डलूमच्या साडीमध्ये तीचे रूप अगदी खुलून दिसत आहे. तीने हे फोटोशूट घराच्या गच्चीवरती केलेले दिसत आहे.
तीचा हो फोटो पाहील्या नंतर ऐश्वर्या रायच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील नंदिनीची आठवण आल्या शिवाय राहात नाही. अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फॅन्स तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर लाईक अँड कमेंटचा वर्षाव करत असतात.
‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर ‘मुंबई साल्सा’ या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी अमृताने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.