मंचर, (प्रतिनिधी) – विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास केल्यास भविष्य उज्वल आहे. त्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते, असे प्रतिपादनवडूज येथील डी. जी. गोडसे महाविद्यालयाचे प्राचार्य सखाराम पाटील यांनी केले.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात, प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र विषयाची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.सखाराम पाटील, प्राचार्य डॉ.नानासाहेब गायकवाड, उपप्राचार्य डॉ. एस. एन. बोलभट, प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा .संजय पोकळे यांच्या हस्ते झाले. प्रा. विलास कुमावत यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात डॉ. के. एन. धुमाळ यांच्या लिखित नेट पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला. या परिषदेमध्ये एकूण ३११ शास्त्रज्ञ, प्राध्यापक संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. एकूण १५० शोध निबंध वाचन करण्यात आले.
या परिषदेमध्ये अनेक देशासह राज्यातील संशोधकांनी भाग घेतला. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. बी. बी. वायकर, मिस. गीतांजली कानडे/ गोणे (साऊथ कोरिया) डॉ. राम गोपाल देवदास (सिक्कीम) यांचे मार्गदर्शन संशोधक विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मिळाले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अभिषेक भोर, प्रा. डॉ. नामदेव आडमुठे, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. हेमांगी गावित यांनी केले. स्टेज व्यवस्थापनाचे काम प्रा. प्रल्हाद नाईक व प्रतीक्षा पवार यांनी पाहिले. या कार्यक्रमाचे समारोपप्रसंगी प्राणीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (बी.ओ.एस.)चे चेअरमन डॉ. आर. डी. चौधरी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
या परिषदेला प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र क्षीरसागर,वनस्पतीशास्त्र विषयाचे विनायक लोखंडे उपस्थित होते. पोस्टर व पेपर वाचन परीक्षणाचे काम डॉ. रसूल जमादार, डॉ. अरुण गुळवे यांनी केले. या परिषदेच्या सर्व रजिस्ट्रेशन व नोंदणीचे काम प्रा.शबनम सय्यद, प्रा. स्नेहल काळे व प्रा. बर्वे यांनी पाहिले. प्रा. हेमांगी गावित व डॉ .एस .एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.