मुंबई – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे माध्यमांद्वारे थेट प्रसारण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परंतु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजनाचा निमंत्रण देण्यात आले नाही. यावरून मानापमान नाट्य सुरु झाले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हंटले कि, आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत, असा निशाणा त्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.
आज मा. बाळासाहेब असते तर,
पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते.मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस !
राजा होण्यासाठी मन मोठं लागतं,
त्यांच्यानंतर…
फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!
— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2021
तसेच, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना कसे आमंत्रित केले नाही? प्रोटोकॉल? मनोरंजक, असे म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
How come MMRDA Minister Eknath Shindeji not invited ?
Protocol?
Interesting!! pic.twitter.com/k4Gu9s5Ey7— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2021