मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘डान्स दिवाने’ च्या सेटवरून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘डान्स दिवाने’ च्या सेटवरील एकाच वेळी तब्बल 18 जणांना करोनाची लागण झाली आहे. नुकताच या कार्यक्रमाचा तिसरा सीजन सुरु झाला होता. अतिशय दिमाखात यंदाच्या सिजनचे ओपनिंग करण्यात आले होते.
‘डान्स दिवाने 3’ शोमध्ये बॅकस्टेज काम करणाऱ्या 18 जणांना करोनची लागण झाली आहे. एफडब्ल्सूआयसीई चे महासचिव अशोक दुबे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी या सर्वांना करोना झाल्याचे निदान झाले. तसेच कार्यक्रमाचे परीक्षक अभिनेत्री माधुरी दीक्षित, धर्मेश येलांडे आणि तुषार कालिया पूर्ण पाने घाबरले आहेत. सध्या राज्यात करोनाचा कहर वाढत असताना आता शूटींगस्थळीही व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री घाबरून गेली आहे.
दरम्यान, सध्या तरी अभिनेत्री माधुरी दीक्षित व शोचे अन्य परिक्षक स्वस्थ असून ते क्वारंटाइनमध्ये असल्याचे कळतेय. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता शो अर्ध्यावरच थांबणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आता देशासह अनेक राज्यांमध्ये करोना विषाणू पुन्हा एकदा आपले पाय घट्ट करण्यास सक्रिय झाला आहे.