नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव सध्या जगावर हळूहळू वाढत चालला असल्याचे समोर येत आहे. त्यातच आता करोनाचा ‘क्रॅकेन’ व्हेरियंट सर्वात वेगाने पसरणारा विषाणू बनला असल्याची धक्कादायक उघड झाली आहे. युरोपिय संघाच्या रोग नियंत्रण विभागाने याविषयी माहिती दिली आहे.
अमेरिकेत करोनाच्या ‘क्रॅकेन’ व्हेरियंटचा प्रसार झपाटयाने होत आहे. लसीकरणानंतरही या विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याचे सांगण्यात येत असून या व्हेरियंटमुळे दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात लोक ‘क्रॅकेन’ व्हेरियंटच्या संसर्गाला बळी पडत आहेत. दरम्यान, क्रॅकेन हा करोनाचा नवी व्हेरियंट नाही. करोनाच्या एक्सबीबी 1.5 व्हेरियंटलाच ‘क्रॅकेन’ व्हेरियंट ते म्हटले गेले आहे.
शास्त्रज्ञांकडून ओमायक्रॉनच्या XBB.1.5 या स्ट्रेनला क्रॅकेन असे टोपणनाव देण्यात आले आहे. त्यामुळे क्रॅकेन हे नवीन नाव ऐकून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हा आधीच अस्तित्वात असलेला करोनाचा सब-व्हेरियंट आहे. मात्र, नागरिकांना खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण क्रॅकेन म्हणजेच XBB.1.5 हा सर्वाधिक संसर्ग होणारा करोनाचा प्रकार आहे. सध्या अमेरिकेमध्ये XBB व्हेरियंटने कहर माजवला आहे. अनेकांना याचा संसर्ग झाला आहे.
XBB 1.5 व्हेरियंट करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या दोन म्यूटेशन म्हणजेच सबव्हेरियंटचा मिळून तयार झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, करोनाचा हा प्रकार सर्वाधिक संसर्गजन्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्या देशामध्येही XBB व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे.