नवी दिल्ली – गाझामधील (Gaza) हमासच्या सुमारे 150 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि उत्तर गाझामधील हमासच्या (Hamas) बालेकिल्ल्याचा ताबा मिळवल्याचा दावा इस्रायलच्या फौजांनी केला आहे. इस्रायलच्या (Israel) सैन्याने हमासच्या शस्त्र निर्मिती केंद्रांना आणि लॉंचिंग स्टेशनही उद्ध्वस्त केली आहेत. याशिवाय लेबेनानमधील हिज्बुल्लाहशी संबंधित ठिकाणेही उद्ध्वस्त करण्यात आल्याचे “आयडीएफ’ने म्हटले आहे. इस3ायलच्या लढाऊ विमानांनी हिज्बुल्लाहच्या पायाभूत सुविधा, शस्त्रांस्त्रांची गोदामे आणि गुप्तचरांची ठिकाणे लक्ष्य केली. गाझामधील हमासच्या प्रशिक्षण आणि लषिकरी केंद्रालाही अशाच प्रकारे लक्ष्य केले गेल्याचे “आयडीएफ’ने म्हटले आहे.
हमासचा आगाडीचा म्होरक्या याह्या सिनवारचा भाऊ मुहम्मद सिनवारच्या कार्यालयाची छडतीही सैन्य दलाच्यावतीने घेम्यात आली. त्या झडतीमध्ये लष्करी कागदपत्रे जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त, सैनिकांनी इमारतींचा ताबा घेतला आणि डझनभर शस्त्रे जप्त केली. यात क्षेपणास्त्रे, ड्रोन, नकाशे, दूरसंचार उपकरणे, मोर्टार, हल्ला ड्रोन आणि तांत्रिक मालमत्ता. सैन्याने सुमारे 30 दहशतवाद्यांचा खात्मा केला असेही “आयडीएफ’ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
इस्रायलच्या आगामी हालचालींबाबत उलट सुलट दावे
गाझामधील सर्व पॅलेस्टिनींना गाझामधून बाहेर काढून इजिप्तच्या सिनाइ द्विपसमूहामध्ये स्थलांतरित करण्यात आल्याचा दावा इस3ायलने केला आहे. इस्रायलच्या माहिती मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या एका प्सटरमध्ये हा दावा केला गेला आहे.
दुसरीकडे हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायलींच्या दोन गटांच्या सुटकेसाठी इस्रायल सरकारकडून हमासशी वाटाघाटी सुरू असल्याची देखील माहिती मिळते आहे. तर इस्रायलकडून गाझा पट्ट्यामध्ये घातक शस्त्रांचा वापर केला जाण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचीही माहिती मिळते आहे. मात्र या दोन्ही दाव्यांबाबत इस्रायलकडून ठोस समर्थन केले गेलेले नाही.