ख्राईस्टचर्च – दीप्ती शर्माने टाकलेला एक नोबॉल भारताच्या महिला संघाला अत्यंत महागात पडला. याचा लाभ दक्षिण आफ्रिका महिला संघाने महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप आलेल्या अखेरच्या साखळी लढतीत भारताच्या महिला संघाचा 3 गडी राखून पराभव केला व थाटात उपांत्य फेरी गाठली.
🚨 MUST WATCH 🚨
Drama 🔁 Agony 🔁 Ecstasy
An all-access, behind-the-scenes look at an epic India-South Africa finale 🔥#CWC22 pic.twitter.com/U4yMELBbfH
— ICC (@ICC) March 28, 2022
या सामन्यातील पराभवासह भारतीय संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दीप्तीने अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना नो बॉल टाकला आणि सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने फिरला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 50 षटकांत 274 धावा करून आफ्रिकेसमोर 275 धावा करण्याचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. हरमनप्रीत कौरने सलामीवीर लायझेल ली हिला धावबाद केले. त्यानंतर लॉरा वोल्व्हहार्ट व लॉरा गुडॉल त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी 125 धावांची भक्कम भागीदारी केली.
राजेश्वरी गायकावडने ही जोडी फोडली. लॉरा वोल्व्हहार्ट 80 धावांवर बाद झाली. त्यानंतर गुडॉलही 49 धावांवर परतली. त्यानंतर सुन लुस 22 तर, मरिझन केप 32 धावांवर बाद झाल्या. त्याचवेळी मिगनोन डू प्रेजने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्यातच दीप्तीने अखेरच्या षटकांत नोबॉल टाकून तिचे काम सोपे केले. दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला.
प्रेजने नाबाद 52 धावांची खेळी केली व संघाचा विजय साकार केला. त्यापूर्वी भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची स्टार फलंदाज व सलामीवीर स्मृती मानधनाने दमदार 71, शेफाली वर्माने 53, कर्णधार मिताली राजने 68 व हरमनप्रित कौरने 48 धावांची खेळी करत संघाला 50 षटकांत 7 बाद 274 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
संक्षिप्त धावफलक
भारत – 50 षटकांत 7 बाद 274 धावा. (स्मृती मानधना 71, मिताली राज 68, शेफाली वर्मा 53, हरमनप्रित कौर 48, मसबाता क्लास 2-38, शबनम इस्माईल 2-42). दक्षिण आफ्रिका – 50 षटकांत 7 बाद 275 धावा. (लॉरा वोल्व्हहार्ट 80, लॉरा गुडॉल 49, मरिझन केप 32, सुन लुस 22, मिगनोन डू प्रेज नाबाद 52, शबनम इस्माईल नाबाद 2, हरमनप्रित कौर 2-42, राजेश्वरी गायकवाड 2-61).