दुबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले आहे. आॅस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने कोहलीला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.
न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटीच्या दोन्ही डावांत कोहली अपयशी ठरला होता. याच सुमार कामगिरीचा फटका कोहलीला बसला आहे.
मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी क्रमवारीत प्रगती केली आहे. अग्रवाल १२ व्या स्थानावरून १० व्या तर, रहाणे नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर आला आहे. चेतेश्वर पुजाराची सातव्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.