पारगाव शिंगवे -पारगाव (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. “एक दिवसीय मराठी शुद्धलेखन कार्यशाळा’ आयोजित केली होती. कार्यक्रमाची सुरुवात “युवापर्व’ या भित्तीपत्रकाच्या अनावरणाने झाली.
विद्यार्थ्यांनी लोकसाहित्य संकलित करून ते स्वहस्ताक्षरात प्रदर्शित केले. याप्रसंगी प्रा. डॉ. उमेश सिरसट आणि प्रा. डॉ. गणेश चौधरी, भीमाशंकर संस्थेचे ओएसडी बी. डी.चव्हाण, व्ही. डी. जाधव, प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, उपस्थित होते. प्रा. मंगेश जोर्वेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 134 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शाकुराव कोरडे यांनी केले. मराठी विभागप्रमुख प्रा. विक्रम ओतारी यांनी आभार मानले.