ICC ODI World Cup 2023 South Africa vs Bangladesh : विश्वचषक 2023 च्या 23 व्या सामन्यात, दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने शतक झळकावत इतिहास रचला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात डी कॉकने 140 चेंडूत 15 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 174 धावांची खेळी केली. यासह तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. विराट कोहलीच्या 5 सामन्यात 354 तर रोहित शर्माच्या 311 धावा झाल्या आहेत. तर क्विंटन डी कॉकच्या 5 सामन्यात 407 धावा झालेल्या आहेत.
यादरम्यान त्याने (क्विंटन डी कॉक) रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकले. डी कॉकने आपले शतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडून काढला तसेच माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या क्लबमध्ये प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकने शतक झळकावून एक खास विक्रम केला आहे. विश्वचषकाच्या एका मोसमात 3 शतके झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता, ज्याने 2011 मध्ये 2 शतके झळकावली होती.
डी कॉकने एकदिवसीय कारकिर्दीतील 20 वे शतकही झळकावले आणि अवघ्या 150 डावात त्याने ही कामगिरी केली. एकदिवसीय डावात सर्वात जलद शतक झळकावणारा क्विंटन हा चौथा फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला मागे सोडले आहे. सचिनने 20 वनडे शतके झळकावण्यासाठी 197 सामने खेळले होते. या प्रकरणात, त्याने 183 डावांमध्ये 20 एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकले.
कमी डावात 20 शतके झळकणारे फलंदाज….
108 – हाशिम आमला
133-विराट कोहली
142 – डेव्हिड वॉर्नर
150 – क्विंटन डी कॉक*
175 – एबी डिव्हिलियर्स
183 – रोहित शर्मा
195 – रॉस टेलर
197 – सचिन तेंडुलकर
दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विश्वचषक शतके..
4- एबी डिव्हिलियर्स
3 – क्विंटन डी कॉक*
2 – हर्शेल गिब्स
2- हाशिम आमला
2- फाफ डु प्लेसिस
एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक म्हणून सर्वोच्च धावसंख्या…
एमएस धोनी (भारत विरुद्ध श्रीलंका) – 183 धावा
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया) – 178 धावा
लिटन दास (बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे) – 176 धावा
डी कॉक (दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश) – 174 धावा