Happy Dussehra 2023: मंगळवारी (24 ऑक्टोबर) देशभरात दसरा साजरा केला जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीच्या द्वारका सेक्टर 10 येथे पोहोचून त्यांनी रावण दहन कार्यक्रमात भाग घेतला. द्वारका येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम पूजा – प्रार्थना केली. कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, प्रभू राम जन्मभूमीवर उभारले जाणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आम्हा भारतीयांच्या संयमाच्या विजयाचे प्रतीक असल्याचे आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi reaches Dwarka Sector-10 Ram Leela to attend the ‘Ravan Dahan’, on the occasion of #Dussehra pic.twitter.com/cQDdLqmdbQ
— ANI (@ANI) October 24, 2023
राम मंदिर लवकरच पूर्ण होईल –
ते म्हणाले, “राम मंदिराच्या उभारणीसाठी काही दिवसच उरले आहेत. लवकरच राम मंदिरात प्रभू रामाची मूर्ती स्थापन केली जाईल. आज आपण भाग्यशाली आहोत की, प्रभू रामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. पुढे अयोध्येत रामनवमीला मंदिरात जयजयकार होईल, ते स्वर संपूर्ण विश्वाला हर्षित करतील.
‘संयमाच्या विजयाचा उत्सव’ –
पंतप्रधान म्हणाले, “विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा, अहंकारावर नम्रतेचा विजय आणि क्रोधावर संयमाचा विजय मिळवण्याचा सण आहे. विजयादशमीला शस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी शस्त्रांची पूजा ही वर्चस्वासाठी नाही, तर संरक्षणासाठी केली जाते.”
चंद्रावर विजय मिळवून 2 महिने पूर्ण –
गीताचे ज्ञान आणि आयएनएस विक्रांत आणि तेजसचे निर्माणही आम्हाला माहीत आहे. आम्हाला श्रीरामाचे मोठेपण माहित आहे आणि आमच्या सीमांचे रक्षण कसे करावे हे देखील माहित आहे. चांद्रयान-3 बाबत पंतप्रधान म्हणाले, “यावेळी आम्ही विजयादशमी अशा वेळी साजरी करत आहोत, जेव्हा चंद्रावरील विजयाला 2 महिने पूर्ण झाले आहेत.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज रावण दहनाच्या दिवशी केवळ पुतळेच दहन होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. समाजातील परस्पर सौहार्द बिघडवणाऱ्या प्रत्येक विकृतीचे दहन व्हायला हवे. आज आपण समाजातील दुष्कृत्ये आणि भेदभाव नष्ट करण्याची शपथ घेतली पाहिजे. विजयादशमी हा सण केवळ रामाच्या रावणावरच्या विजयाचा सण नाही, तो राष्ट्राच्या प्रत्येक दुष्कृत्यावर देशभक्तीच्या विजयाचा सण बनला पाहिजे.