मुंबई – हरनाझ संधूने 21 वर्षांनंतर “मिस युनिव्हर्स’चा किताब भारताला मिळवून दिला असून, सध्या हरनाझला अनेक बॉलिवूड सिनेमांची ऑफर मिळत असल्याचे दिसून येत आहे. माजी विश्वसुंदरी ‘मानुषी छिल्लर’ अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ सिनेमातून लवकरच बॉलीवूड पदार्पण करत आहे.
अश्यातच आता मिस युनिव्हर्स किताब मिळवून जगभरात भारताचा लौकिक वाढविलेल्या हरनाझ संधूनेदेखील आपल्याला सिनेमात काम करण्याची इच्छा आहे.. असं व्यक्त केलं आहे. हरनाझला जेव्हा विचारण्यात आले की, तिला कुणाचा बायोपिक करायला आवडेल, तेव्हा तिने अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव घेतले.
यावेळी हरनाझ म्हणाली, “प्रियांका चोप्राचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे, तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, प्रियांकाने स्वतःला ब्रँड बनवले आहे, तिच्या मार्गावरून चालायला आवडेल..’ असं ती म्हणाली.
दरम्यान, पाहिलं गेलं तर हरनाझ संधूने सौंदर्यवतीचा किताब मिळविण्यापूर्वीच “यारा दिया पू बालन’ आणि “बाई जी कुटांगे’ हे दोन पंजाबी सिनेमे तिने स्वीकारले आहेत. अर्थात या सिनेमांचे शूटिंग अद्याप झालेले नाही.