अहमदनगर – अहमदनगरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची बामती आईला कळताच मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना प्रवरानगर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजेंद्र दत्तात्रय गागरे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून नलिनी दत्तात्रय गागरे आईचे नाव आहे. राजेंद्र हा LIC एजंट म्हणून काम करत होता तर त्याची आई ही सेवानिवृत्त मुख्याध्यापिका होती.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दुचाकीने राजेंद्र लोणी येथून आपल्या घरी जात होता. दरम्यान लोणी कोल्हार रोडवर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. हा अपघात भीषण असल्यामुळे राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या अपघाताची माहिती आईला कळल्यावर अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी नातेवाईकांनी नलिनी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांना त्यांना वाचविण्यात यश आले नाही.