मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज व अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने आपण जोपर्यंत शरीर साथ देत राहील तोपर्यंत आयपीएल स्पर्धेत खेळत राहणार असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना अन्य कोणत्याही लीगमध्ये मी खेळत नाही. परंतू आयपीएलसाठी आयसीसीने खास विंडो दिली असल्याने मला त्यात यापुढेही अनेक वर्षे खेळता येणार आहे.
माझ्यासाठी तंदुरुस्त राहणे महत्वाचे आहेच परंतू जर मी खेळत राहीलो तरच तंदुरुस्तही राहीन. विश्रांती घेतल्यावर जो काळ आपण काहीही करत नाही त्यावेळी आपले आपल्या तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. याचा अनुभव मी करोना काळात घेतला आहे. त्यावेळी मला जिममध्ये कित्येक तास मेहनत करावी लागली होती. त्यामुळे जोपर्यंत माझे हात-पाय चालत आहेत तोपर्यंत आयपीएल स्पर्धेत खेळत राहणार आहे, असेही तो म्हणाला.
Rishabh Pant : आयपीएलद्वारेच पंतचे पुनरागमन; दिल्ली कॅपिटल्सला विश्वास
आयपीएल स्पर्धेत खेळल्याने टी-२० क्रिकेटचा चांगला सराव मिळतो व त्याचा लाभ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट खेळताना होतो हे मी अनेकदा दाखवून दिले आहे. तसेच खेळपट्टीवर जीतकाकाळ उभे राहीन तेव्हा संघाच्या विजयाचीही खात्री देता येते हे देखील मी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत तसेच भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतही दाखवून दिले आहे, असेही तो म्हणाला.
डीवीलीयर्स व कोहली आदर्श
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डीवीलीयर्स व भारताचा महान फलंदाज विराट कोहली यांच्यासह मी एकाच संघातून आयपीएल खेळलो आहे. ते तंदुरुस्त राहण्यासाठी कीती मेहनत घेतात हे मी जवळून पाहीले आहे. त्यामुळे वय काहीही असो तुमची तंदुरुस्ती योग्य असणे महत्वाचे आहे हे मी त्यांच्याकडून शिकलो व त्यामुळेच ते माझे आदर्श खेळाडू आहेत, असेही मॅक्सवेल म्हणाला.