विश्रांतवाडी –माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने निषेध करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना भडकाविणारा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या गुणरत्ने सदावर्तेंच्या फोटोला देशी दारूने आंघोळ घालण्यात आली.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, नगरसेवक महेंद्र पठारे, ऍड. भैय्यासाहेब जाधव, माजी नगरसेविका उषा कळमकर, मनोज पाचपुते, शशीकांत टिंगरे, किरण खैरे, राजेंद्र खांदवे, बंटी म्हस्के, नानासाहेब नलावडे, श्रद्धा साठे, आशिष माने, विशाखा गायकवाड, मंदाकिनी चांदेरे, संदीप पोकळे, शैलेश राजगुरू तसेच वडगावशेरी मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.