मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले. तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. राज ठाकरेंच्या या भाषांतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या भाषणावर टीका केली, तर भाजप नेत्यांनी या भाषणाला पाठिंबा दिला आहे.
Maharashtra | MNS has announced to put a loudspeaker outside Shiv Sena Party HQ ‘Shiv Sena Bhawan’ in Mumbai and play Hanuman Chalisa on it today on the occasion of #RamNavami pic.twitter.com/CkQXME2aeX
— ANI (@ANI) April 10, 2022
यातच आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं. दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. याद्वारे शिवसेनेला हिंदुत्वासाठी जागं करण्याचा प्रयत्न असल्याचं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं. यानंतर दादर पोलिसांनी किल्लेदार आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.