नवी दिल्ली : नेरोका एफसी संघाने दोन गोलच्या पिछाडीनंतर जोरदार पुनरागमन करत हिरो आय लीग फुटबाॅल स्पर्धेत चेन्नई सिटी एफसीला २-२ ने बरोबरीत (ड्राॅ) रोखले. बरोबरीनंतर चेन्नई सिटीचा संघ ५ गुणांसह गुणतालिकेत ७ व्या स्थानी तर नेरोका एफसीचा संघ ४ गुणांसह ८ व्या स्थानी पोहचला आहे.
Another frustrating draw for champions @ChennaiCityFC as @NerocaFC snatch 1️⃣ point from Coimbatore tonight.
CCFC 2️⃣-2️⃣ NFC#HeroILeague 🏆 #LeagueForAll 🤝 #IndianFootball ⚽ #CCFCNFC ⚔️ pic.twitter.com/a0JkJD6zXU
— Hero I-League (@ILeagueOfficial) December 21, 2019
चेन्नई एफसी संघाकडून कातमुसी युसाने २६ व्या आणि मशूर शरीफने ३१ व्या मिनिटाला गोल केला. तर, नेरोका एफसी संघाकडून खाईमिनथांग लुंगदिमने ४५+३ व्या आणि बोबाकार डायराने ६५ व्या मिनिटाला गोल करत करत बरोबरी साधली.