Madhya Pradesh Election Result 2023 Live Updates : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मध्य प्रदेशात सुरुवातीचे ट्रेंड दिसू लागले आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार मध्य प्रदेशात भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. मध्य प्रदेशात भाजप 159 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 67 जागांवर आघाडीवर आहे. ही आकडेवारी निवडणूक निकाल नसून सुरुवातीचे ट्रेंड आहेत.
माझा मध्य प्रदेशातील लोकांवर विश्वास – कमलनाथ
तर माजी मुख्यमंत्री कमलनाथ छिंदवाडामधून आघाडीवर आहेत. कमलथ छिंदवाडामधून दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशातील सुरुवातीच्या ट्रेंडवर कमलनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आहे. ते म्हणाले की, मी अजून ट्रेंड पाहिलेला नाही, पण माझा मध्य प्रदेशातील लोकांवर विश्वास आहे.
VIDEO | Madhya Pradesh elections 2023: “I have not seen the trends yet, but I have faith in the people of Madhya Pradesh,” says Madhya Pradesh Congress president @OfficeOfKNath as counting of votes for MP Assembly polls begins.#AssemblyElectionsWithPTI… pic.twitter.com/tGd3ETljac
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2023
मध्य प्रदेशात 230 जागांवर झाले मतदान
मध्य प्रदेशातील व्हीआयपी जागांबदल बोलायचे झाले तर बुधनी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आघाडीवर आहेत. दतिया विधानसभा मतदारसंघातून मध्य प्रदेशातील नरोत्तम मिश्रा आघाडीवर आहेत. दिमानी जागेवरून नरेंद्र सिंह तोमर हे सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मागे आहेत.
उल्लेखनीय आहे की, 25 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील 230 विधानसभा जागांवर मतदान झाले होते. मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. मध्य प्रदेशात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. यावेळी राज्यातील 230 जागांवर 76.62 टक्के मतदान झाले असून, हा आतापर्यंतचा विक्रम आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष प्रचंड बहुमताने विजयाचा दावा करत आहेत. तथापि, निकालांचे ट्रेंड काही वेळातच दिसू लागतील. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासोबत जितू पटवारी यांनीही मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 पैकी 135 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात दणदणीत विजयाचा दावा केला आहे.
दरम्यान, 2018 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2018 मध्ये काँग्रेसने राज्यात 114 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. 2018 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसने सरकार स्थापन केले. मात्र, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ यांचे सरकार पडले.