हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – मी आयएएस झालेलो आहे. सध्या परीविक्षाधीन काळात आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर आहे, असे सांगून हिंगोलीतील पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा मुख्य अतिथी बनलेल्या तोतयाविरुद्ध १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास गुन्हा दाखल झाला.आहे. तोतया अमोल पजईचे शाळेच्या कार्यक्रम पत्रिकेत अमोल मराठे असे नाव दिले होते.
डिसेंबर २०१२ मध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अमोल वासुदेव पजई (३२) हा हिंगोलीत दाखल झाला. त्याने अनंता मधुकर कलोरे (४२, रा.मोठी उमरी, ता.जि. अकोला) व संदीप ऊर्फ इंद्रजितएकनाथ पाचमाशे (३४, रा. सुराणानगर, हिंगोली) यांच्या मदतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे भासवून पोतदार शाळेत दोन मुलांचे प्रवेशही करून घेतले.मुलांच्या फॉर्ममध्येही हे पद नमूद केले. या पदावर असल्याने शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास हजेरी लावली. शाळेने पत्रिकेत अगदी पहिलेच नाव छापून त्यांना प्रमुख पाहुणा केले. शाळेची फसवणूक केल्याचे प्राचार्य विनय उपाध्याय यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रारीत म्हटले.
पोलिस अधीक्षकांच्या सतर्कतेने प्रकार उघड
हा प्रकार आधी शाळेच्या लक्षात आला नव्हता. मी पण आयएएस.अधिकारी असल्याची त्याने शाळेला बतावणी केली. २०२० च्या बॅचचा असल्याचे सांगितले. अतिरिक्त.जिल्हाधिकारी असून हिंगोलीत येणार बदलीवर.असल्याचे सांगितले. यामुळे जी श्रीधर यांना शंका आल्याने त्यांनी ती यादी तपासली. दिलेला कोड चेक केला तर तो झारखंडमधील अधिकाऱ्याचा निघाला. त्यामुळे त्यांनी पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांना संबंधिताचा मोबाइल क्रमांक देऊन यात तपासणी करण्यास सांगितले
गाडीतील कागदपत्रांने लागला सुगावा
अमोलकडे महागडी चारचाकी आहे. तिची तपासणी केली असता त्यात हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेटर पॅड, एनटीसीतील अर्बन बँकेची कागदपत्रे, भाडे करायचे बाँड,.पत्नीचे ओळखपत्रही आढळले. या.ओळखपत्रावर गृह मंत्रालय.गव्हर्नमेंट ऑफ इंडियन मिनीस्ट्री.ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट, तसेच.नाव व फॉरेस्ट रेंज ऑफिसर अशी संशयित कागदपत्रे आढळली..या गाडीतील पाच लाखांची रोकडही ताब्यात.घेतली. अमोलच्या पत्नीलाही पोलिसांनी चौकशीस बोलावले होते.
अमोल पजई, आनंता कलोरे व संदीप पाचमाशे या.तिघांनाही पोलिसांनी ताब्यात.घेतले आहे. ताब्यात असतानाहीअमोल मात्र मला उद्या दुपारपर्यंतची वेळ द्या, मी माझी उपजिल्हाधिकारी पदाची प्रोबेश्नरीची ऑर्डर दाखवितो, असे सांगत असल्याचे दिसून येत होता. मात्र तोपर्यंत फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.